कोलकाता : आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा धक्कादायक विधान करत वादाला तोंड फोडला आहे. या वेळेस भारतीय सैन्यदलाला लक्ष्य करत ममता दिदी म्हणाल्या की भारतात येणारे बांगलादेशी घुसखोर हे सुरक्षा दलातील सैनिकांमुळे भारतात प्रवेश करतात असे वादग्रस्त विधान ममता बॅनर्जी यांनी केले आहे. त्याच बरोबर, इस्लामपुर, सिताई, चोपरा या गावांतून गुंड पाठवून केंद्र सरकारचा पश्चिम बंगाल अस्थिर करण्याचा डाव असल्याचा अजब दावा त्यांनी केला आहे.
शेख हसिना यांनी बांगलादेशातून पलायन केल्यानंतर, भारताच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात हालचाल बघायला मिळाली. यावरच नियंत्रण ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल रात्रंदिवस खडा पहारा देत आहे. आणि यांच्याच कार्याचा अपमान केला जातोय. सोबत ममता बॅनर्जी यांनी जिल्हा प्रशासनावर सुद्धा ताशेरे ओढले आहेत. आपल्या पक्षासाठी बचावात्मक पवित्रा घेत ममता बॅनर्जी म्हणाल्या की सुरक्षा दलातील लोकं महिलांवर अत्याचार करतात. सीमावर्ती भागाचे रक्षण करणे हे त्यांचे काम आहे, तृणमूल काँग्रेसचे नाही. जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांना घुसखोरांचे येणं जाणं ठाऊक असतं. ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की त्या केंद्र सरकारला निषेध पत्र लिहणार असून, सदर गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यायला लावणार आहेत.