नवीन वर्षात हीरो आणि होंडा लॉन्च करणार ४ नव्या दुचाकी
यात दोन इलेक्ट्रीक दुचाकी असणार
02-Jan-2025
Total Views |
मुंबई : भारतीय वाहन बाजारात दरवर्षी नवीन दुचाकी लॉन्च होत असतात. त्यात हीरो आणि होंडा कंपनीकडून देशातील दुचाकी प्रेमींसाठी एक खुषखबर देण्यात आली आहे. २०२५ यावर्षात हीरो आणि होंडा कंपनीकडून ४ नव्या दुचाकी बाजारात येणार आहेत. त्यातील दोन इलेक्ट्रीक दुचाकी असणार आहेत त्यामुळे दुचाकी प्रेमींसाठी ही नक्कीच मोठी गोष्ट ठरणार आहे.
येणाऱ्या नवीन दुचाकींमध्ये हीरो डेस्टीनी १२५च्या नव्या व्हर्जनचा समावेश असणार आहे. यामध्ये १२४.६ सीसी एअर कूल्ड इंजीन असणार आहे. याची किंमत ८२-८८ हजार इतकी असू शकते. हीरो झूम १२५ आर हीसुध्दा यावर्षी बाजारात येणार आहे. यामध्ये आकर्षक फीचर्ससह जास्त क्षमतेचे इंजिन असणार आहे. या गाडीची किंमत ८५ ते ९० हजार असण्याची शक्यता आहे. याशिवाय होंडा अॅक्टिवा ई आणि होंडा क्यूसी १ या दोन दुचाकीसुध्दा यावर्षी बाजारात येणार आहेत. या दोन्ही इलेक्ट्रिक दुचाकी असणार असून या फेब्रुवारी पर्यंत बुकिंगसाठी खुल्या होतील.