विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल म्हणाले की, "बांगलादेश हे फुटीरतावाद्यांचे स्वर्ग बनले आहे. त्यांची न्यायव्यवस्था जिहादींच्या दबावाखाली काम करत असल्याचेच दिसते आहे, जे विकृत, जिहादी, हिंदूविरोधी आणि बांगलादेशविरोधी मानसिकतेचे प्रतीक आहे. बांगलादेशातील तरुणांनी इस्लामची प्रतिमा नष्ट केली आहे."
उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
इस्कॉनचे प्रवक्ते राधारमण दास म्हणाले की, सुनावणीदरम्यान एक चांगली गोष्ट म्हणजे हिंदू वकिलांना चिन्मय दास यांची बाजू न्यायालयात मांडता आली. यापूर्वी सुनावणीदरम्यान वकिलांना त्यांची बाजू मांडण्याची परवानगी नव्हती. चिन्मय कृष्ण दासचे वकील आता बांगलादेशच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करतील. उच्च न्यायालयात याचिकेच्या सुनावणीदरम्यान बांगलादेशचे अंतरिम सरकार चिन्मय दास यांच्या वकिलांना न्यायालयाच्या आवारात आणि बाहेर पुरेशी सुरक्षा पुरवेल, अशी आशा आहे.