बदोडे : मराठी वाङमय परिषद, बडोदे आयोजित ७४ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्यासाठी पत्रकार, वक्ते आणि लेखक डॉ. उदय निरगुडकर यांनी संमती दिली आहे. मराठी वाङमय परिषद, बडोदे या संस्थेच्या कार्यकारी मंडळाने बुधवार ११ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. उदय निरगुडकर भ्रमणध्वनीवरुन तशी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीचा मान राखून निरगुडकर यांनी या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविण्यास संमती दिली आहे. मराठी वाङमय परिषद, बडोदे आयोजित ७४ व्या साहित्य संमेलन ७ व ८ फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहे. संमेलनाची संपूर्ण माहिती परिषदेतर्फे लवकरच कळविण्यात येणार आहे.
डॉ. उदय निरगुडकर हे टाटा, गोदरेज यांसारख्या कंपन्यांमध्ये २०हून अधिक वर्षे आयटी तज्ज्ञ व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. 'झी २४ तास', `न्यूज१८ लोकमत' या वृत्तवाहिन्यांच्या व DNA या दैनिकाच्या मुख्य संपादक पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली .
`लोकल ते ग्लोबल' जागतिकीकरण, भारताचा बदलता चेहरा आणि All about winning Indian Elections या पुस्तकांचे तसेच C.E.O. या कादंबरीचे लेखन त्यांनी केले आहे. वीर सावरकर - फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष या पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केला आहे.