मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mahakumbha) उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे दि. १३ जानेवारीपासून महाकुंभाला सुरुवात होत आहे. या निमित्ताने देशभरातून भाविक, विविध आखाड्यातील साधू-संत प्रयागराज येथे उपस्थित होत आहेत. दरम्यान एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. महाकुंभात हिंदूंचे शिरच्छेद करून बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमक्या एका इस्लामिक कट्टरपंथीकडून देण्यात आल्या आहेत. नासर पठाण असे त्या जिहाद्याचे नाव असून त्याने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून ही धमकी दिली होती. त्याच्यावर कारवाई करण्याकरीता सोशल मीडियावर मोहीम सुरू आहे.
व्हायरल झालेल्या पोस्टनुसार नासर पठाण नावाने चालणाऱ्या एका आयडीवरून दुसऱ्या व्यक्तीला मेसेज पाठवण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामध्ये हिंदूंच्या भावना भडकवणारा आशय लिहिल्याचे पाहायला मिळत आहे. नासर पठाण हा बिहारच्या पूर्णिया येथील भवानीपूर गावचा रहिवासी असल्याचेही कळत आहे. सध्या प्रयागराज व बिहार पोलिसांकडे कारवाईची मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभाच्या सुरक्षेसाठी ३५ हजारहून अधिक पोलीस आणि होमगार्ड कर्मचारी तैनात केले आहेत. महाकुंभ परिसरात ५६ चौक्या तयार करण्यात आल्या आहेत. संपूर्ण परिसर कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहे.