मुंबई : राज्य सरकारने दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांवर केलेली पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले.
दुर्गम आणि माओवादग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. यामुळे जीवन सुलभतेला निश्चितच चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग प्रशस्त होईल. गडचिरोली आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील माझ्या बंधू भगिनींचे विशेष… https://t.co/IbDVZ4GO2v
बुधवार, १ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात विविध कामांचे लोकार्पण केले. यासंदर्भातील एक पोस्ट त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर शेअर केली. यावर पंतप्रधान मोदी यांनी उत्तर देत राज्य सरकारला कौतुकाची थाप दिली.
पतंप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "दुर्गम आणि माओवादग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. यामुळे जीवन सुलभतेला निश्चितच चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग प्रशस्त होईल. गडचिरोली आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील माझ्या बंधू भगिनींचे विशेष अभिनंदन," असे ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.