गाडीत भजन सुरू असताना कट्टरपंथींकडून वाहनावर हल्ला, हल्लेखोर ममता बॅनर्जींची व्होट बँक असल्याचा भाजप नेत्याचा दावा

    02-Jan-2025
Total Views |

Bhajan
 
कोलकाता : भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांनी आपल्या X ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. प. बंगाल राज्यातील मोदिनीपूर जिल्ह्यातील कांठी शहरामध्ये कट्टरपंथी जमावाने भजन करणाऱ्या वाहनावर हल्ला केला आहे. वक्फ दुरूस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्या बैठकीदरम्यान ही घटना घडली आहे. सुवेंदू अधिकारी म्हणाले की, कांठी सेंट्रल बसस्थानक परिसरातून एक वाहन जात असताना त्या गाडीत भजन सुरू होते.
 
हा हल्ला ममता बॅनर्जींच्या मतदारांकडून झाला असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेत्याने सांगितले की, भजन लावण्यात येणाऱ्या चारचाकी वाहनातील दोघेजण जखमी झाले आहेत. सुवेंदू अधिकारी यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओत नमाजी टोप्या दिसत आहेत. ते पुरूष वाहनावर हल्ला करत असताना दिसत आहेत.
 
 
गाडीतील प्रवाशांवर जमावाने हल्ला केल्यानंतर भयावह परिस्थिती निर्माण झाली. वाहनात प्रवास करत असलेल्या प्रवाशांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. असे ट्विट त्यांनी लिहिले.
 
यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे. त्यांनी शेअर केलेला व्हिडिओ हा गुन्हेगारांची ओळख पटवून देण्यास परिपूर्ण असल्याचे म्हटले गेले आहे.