मनू भाकर अन् जग्गजेता बुद्धिबळपटू डी. गुकेशसह ४ खेळाडूंना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित
३२ खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर
02-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने २ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ ची घोषणा केली. यामध्ये भारताची अव्वल नेमबाजपटू मनू भाकरने पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत दोन कांस्यपदक मिळवत अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मनू भाकरने आपल्या भारताची मान उंचावली आहे. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत डी. गुकेशसह इतर ४ खेळाडूंना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
डी. गुकेशसह हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंह, आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रवीण कुमार यांनाही खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. खेलरत्न पुरस्कारासाठी एकूण ३२ खेळाडूंची नावे दाखल करण्यात आली आहेत. त्यात १७ पॅरा ॲथलेटिक्स खेळाडूंचा समावेश आहे.
Ministry of Youth Affairs and Sports announces the Khel Ratna Award for Olympic double medalist Manu Bhaker, Chess World Champion Gukesh D, Hockey team Captain Harmanpreet Singh, and Paralympic Gold medallist Praveen Kumar. pic.twitter.com/VD54E0EtEk
येत्या १७ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रपती भवनात पुरस्कार विजेत्या खेळाडूंना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. दरम्यान, खेलरत्न पुरस्कारासाठी खेळाडूला २५ लाख रूपये दिले जातात. यासोबत सन्मानचिन्ह आणि आकर्षक चषक देण्यात येतो. याआधी खेलरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूला ७.५ लाख रूपये दिले जात होते. परंतु २०२० या वर्षानंतर २५ लाख रूपये रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला.