जानेवारीमध्ये देशभरात साजरे होणार 'हे' महत्वाचे सण-उत्सव

    02-Jan-2025
Total Views |
 
image
 
मुंबई : जानेवारी हा महिना आनंद आणि उत्साहाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात देशभरात अनेक सण, उत्सव आणि महोत्सव साजरे होतात. हे सण, उत्सव आणि महोत्सव पुढीलप्रमाणे आहेत:
 
१) थ्री किंग फिस्ट गोवा – ६ जानेवारी (Three King Feast, Goa)
 थ्री किंग फिस्ट हा उत्तर आणि दक्षिण गोव्यामध्ये साजरा केला जाणारा हा उत्सव आहे. ख्रिश्चन धर्मीयांसोबतच गोव्यातील हिंदु नागरिकही हा सण साजरा करतात. या दिवशी निवडक तीन मुले राजाचा वेश परिधान करतात.
 
२) बिकानेरमधील उंट महोत्सव – १० ते १२ जानेवारी (Bikaner Camel Festival)
बिकानेर हे शहर उंटांचे शहर म्हणून ओळखले जाते. पूर्वीच्या काळी राज्याची उपजीविका पूर्णपणे उंटांवर अवलंबून होती, उंट सैन्यात भरतीही होत असत. उंटांच्या तुकड्यांना "गंगा रिसाला" म्हणून ओळखले जायचे. बिकानेर मध्ये उंटांना विशेष महत्व असल्यामुळेच हा महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवादरम्यान उंटांना सजवले जाते, त्यांच्या शर्यती लावल्या जातात आणि इतरही अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात.
 
३) आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव – ११ ते १४ जानेवारी (International Kite Festival, Gujrat)
गुजरातमधील कच्छ या वाळवंटात हा महोत्सव होतो. या महोत्सवात देशभरातील आणि विदेशातील हजारो लोक पतंग उडवतात.
 
४) पोंगल, मकरसंक्रांत, माघ बिहू – १४ जानेवारी (Pongal, Makarsankrant, Magh bihu)
महाराष्ट्रात मकरसंक्रांत साजरी केली जाते. त्याचवेळी दक्षिण भारतात पोंगल आणि ईशान्य भारतात माघ बिहू हा सण साजरा केला जातो.
 
५) लोहरी - १३ जानेवारी (Lohri)
लोहरी हा सण हिवाळा संपण्याचे प्रतीक मानला जातो. हा सण मकर संक्रांतीच्या एक रात्र आधी मोठ्या थाटामाटात देशभरात, प्रामुख्याने पंजाबमध्ये साजरा केला जातो, याला माघी असेही म्हणतात.
 
६) मोढेरा महोत्सव, गुजरात - १८ जानेवारी (Modhe Dance Festival, Gujrat)
गुजरातमधील मोढेरा येथे नृत्य, नाट्य संगीताचा महोत्सव आयोजित केला जातो.
 
७) प्रजासत्ताक दिन परेड १६ जानेवारी (Republic Day Parade)
दरवर्षी, प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहत साजरा केला जातो. १९५० मध्ये या दिवशी भारतीय राज्यघटना संविधान सभेने स्वीकारली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला होता. भारतीय राज्यघटनेने देशाला प्रजासत्ताक आणि लोकशाही म्हणून घोषित केले. दरवर्षी, प्रजासत्ताक दिन हा भारतीय राज्यघटनेतील मूल्ये आणि नैतिक मुल्यांचे स्मरण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील राजपथ येथे देशातील विविधतेचे आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम आयोजित केले जातात.