पंजाबी गायक दिलजीत दोसांझवर तक्रार दाखल

    02-Jan-2025
Total Views |

Diljit Dosanjh
 
चंदीगड : पंजाबी गायक दिलजीत दोसांझवर (Diljit Dosanjh) मद्याचा प्रचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. लुधियाना येथील त्यांच्या एका कॉन्सर्टवेळी त्यांना मद्याचा प्रचार केल्याची घटना घडली होती. याचपाश्चात पंजाबच्या महिला आयोगाकडे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार एका प्राध्यापकाने केली आहे.
 
'पंच तारा' 'पटियाला पेग' आणि 'केस' यांसारख्या गाण्यांच्या माध्यमातून दोसांझ पंजाबी गायकाने दारूचा प्रचार केल्याचा आरोप एका प्राध्यापकाने आरोप केला आहे. लाईव्ह कॉन्सर्टवेळी हा आरोप करण्यात आला होता.  यावेळी उपस्थितांनी गाण्यामध्ये दारूबाबत कोणतेही एक वक्तव्य करू नये अशी विनंतीही केली.
 
दरम्यान, या तक्रारीत महिला विभागाने लुधियाना कॉन्सर्टमधील काही गाणी बंद करण्यास सांगितली. याबाबत अनेकदा नोटीशीही जाहीर करण्यात आली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे अशी आहे की, यापूर्वीही तेलंगणामध्येही दिलजीत दोसांझला अशा अनेक नोटीसा आल्या होत्या.
 
तसेच इंदूर येथेही एका कॉन्सर्टदरम्यान, गायकाने ब्लॅक स्वरूपात म्हणजेच अवैध तिकीट विक्रीच्या मुद्दयाकडे लक्ष वेधले आहे. ज्यात दारू आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या गाण्यांबाबत तक्रारीचा उल्लेख करण्यात आला. दिलजीत दोसांझच्या गाण्याचा वाद हा नवीन विषय नाही.