युनुस सरकारची मुस्कटदाबी; चिन्मय दास यांना जामीन नाहीच
बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयात ११ हिंदू वकिलांचा युक्तिवाद
02-Jan-2025
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Chinmay Krishna Das Update) बांगलादेशात मुहम्मद युनुस यांचे अंतरिम सरकार आल्यापासून हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचाराचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. इस्कॉन प्रभु चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. महिना उलटूनही अद्याप त्यांना जामीन मंजूर झालेला नाही. चटगाव मेट्रोपॉलिटन कोर्टाचे सत्र न्यायाधीश मोहम्मद सैफुल इस्लाम यांनी गुरुवार, दि. २ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीनंतर चिन्मय कृष्ण दास यांचा जामीन फेटाळल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयात तब्बल ११ हिंदू वकिलांनी चिन्मय दास यांची बाजू मांडली होती.
यापूर्वी झालेल्या दोन सुनावणींमध्ये चिन्मय कृष्ण दास यांच्याबाजूने युक्तिवाद मांडणाऱ्या वकिलांना न्यायालयात हजर राहू दिले नव्हते. अॅड. रेमण रॉय यांच्यावर इस्लामिक कट्टरपंथींकडून जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाचे हिंदू वकील रवींद्र घोष यांच्यावरही हल्ला झाल्याचे समोर आले होते. ४० वकिलांच्या एका गटाने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.