दुर्गा मातेच्या मंदिरावर '786', 'अल्लाह' असे लिहित समाजकंटकांचा उन्माद

मंदिराला सीसीटीव्ही नसल्याने समाजकंटक फरार

    02-Jan-2025
Total Views |

 '786', 'Allah'
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील बरेली या शहरातील बिहारीपूरमध्ये असलेल्या आला हजरत दर्ग्याजवळ असलेल्या प्राचीन दुर्गा मंदिरा़च्या भिंतीवर काही समाजकंटकांनी 786 असा मुस्लिम धर्मासाठी लकी असलेला क्रमांक लिहिला. तसेच त्या भिंतीवर अल्लाह असेही नाव लिहिले. गुरूवारी उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये जातीय तणाव निर्माण झाला असल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आता पोलिसांना माहिती देण्यात आली असून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दर्गा मंदिराच्या पुजाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या घटनेमुळे स्थानिक हिंदू लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी पंकज श्रीवास्तव हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी केलेल्या आदेशानुसार, हिंदू मंदिरावर लिहिण्यात आलेला 786 आणि अल्लाह असे नाव काढून टाकण्यात आले. त्यावेळी मंदिराची भिंत पूर्णपणे भगव्या रंगाने रंगवण्यात आली आहे.
 
मंदिर प्रवेशाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नसल्याने संबंधित समाजकंटकांची ओळख पटू शकली नाही. मात्र, गुन्हेदारांची ओळख पटवण्यासाठी पोलीस मंदिराच्या आजूबाजूच्या इमारतींवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या अधारे तपाणसी करत आहेत.