जिहाद्यांनी आई समोरच केले मुलाचे अपहरण; घटना सीसीटिव्हीत कैद
02-Jan-2025
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bangladeshi Hindu Pranto Talukdar) बांगलादेशात ऑगस्ट महिन्यात झालेल्या सत्तांतराच्या नाट्यानंतर युनुस सरकार सत्तेत आले. मुहम्मद युनुस यांच्या कार्यकाळात बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले. चार महिने उलटूनही ते अद्याप सुरुच आहेत. जमात-ए-इस्लामीच्या दहशतवाद्यांनी एका हिंदू युवकाचे त्याच्याच घरातून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
प्रान्तो तालुकदार असे या हिंदू युवकाचे नाव असून चितगावमध्ये तो राहतो. त्याने त्याच्या सोशल मिडियावर इस्कॉनचे चिन्मय प्रभू यांच्या सुटकेबाबद एक पोस्ट लिहिली होती. देशद्रोहाच्या खोट्या आरोपावर तुरुंगात असलेले चिन्मय कृष्ण दास यांचे समर्थन केल्यामुळे बांगलादेशातील इस्लामिक कट्टपरंथींनी प्रान्तो तालुकदार या तरुणाचे त्याच्यात घरातून त्याच्या आईसमोरून अपहरण केले. मिळालेल्या माहितीनुसार प्रान्तो तालुकदारवर सध्या एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.