"अरविंद केजरीवाल २० हजार मतांनी पराभूत होतील"

19 Jan 2025 16:05:10
 
 
नवी दिल्ली  Delhi Vidhansabha 2025 : अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून २० हजार मतांनी पराभूत होतील, असा दावा आता दिल्लीचे भाजप उमेदवार परवेश शर्मा यांनी केला. त्यांनी कागदोपत्री हा दावा केला आहे. संबंधित कागदपत्रातून त्यांनी अरविंद केजरीवाल यांना प्रचारासाठी दिल्लीच्या लोकांच्या दाराशी जाऊन प्रचार करावा लागेल असे त्यांनी कागदावर नमूद केले आहे.
 
तसेच त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये आज मी तुमच्यासमोर एक घोषणा करत आहे आणि केजरीवाल यांना आव्हान देत आहेत. मी ते तुमच्यासमोर कागदावर लिहित आहे की, अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभेतून २० हजार मतांनी पराभूत होतील. मी हे संपूर्ण दिल्लीतील लोकांना सांगत आहे.
 
 
 
प्रवेश वर्मा पुढे म्हणाले की, तुम्ही पंजाबचे पोलीस प्रशासन आणले आणि पंजाबमधील पक्षाचे लोक जरी दिल्लीत आणले तरी, नवी दिल्ली विधानसभेतील लोकांना तुमचे अस्तित्व आणि वास्तव माहिती आहे. या स्थानिक लोकांना ११ वर्षांपासून त्यांनी सहन केले. मी हे आपल्यासमोर लिहित आहे. ८ तारखेला दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मी तुम्हाला संबंधित पेपर पुन्हा दाखवेन, असे वर्मा म्हणाले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0