कोलकाता पुस्तक मेळाव्यात विश्व हिंदू परिषदेला पुस्तकांचा स्टॉल लावण्यास केला विरोध

18 Jan 2025 19:43:34
 
 
Vishwa Hindu Parishad
 
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळाव्यात विश्व हिंदू परिषदेला पुस्तकांचा स्टॉल लावण्यासाठी विरोध दर्शवला आहे. विश्व हिंदू परिषदने स्टॉल लावण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यासाठी अर्जही करण्यात आला होता मात्र संबंधितांनी स्टॉल लावण्यास नकार दिला. शुक्रवारी १७ जानेवारी २०२५ रोजी कोलकाता उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आली होती.
 
या विश्व हिंदू परिषदेने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पब्लिशर्स अँड बुकसेलर्सने स्टॉलसाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जात नमूद केले होते की, अनेक वर्षांपासून पुस्तक मेळाव्यात सहभागी होत आहे. यामुळे पुस्तक मेळाव्यामध्ये पूर्ण हक्क असूनही स्टॉल लावला दिला जात नाही. त्यांचा अर्ज प्रलंबित ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे की, पब्लिशर्स आणि पुस्तक विक्रेत्यांकडून कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही.
 
दरम्यान २८ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीदरम्यान, पुस्तक मेळाव्यातील स्टॉलसाठी विश्व हिंदू परिषदेने सादर केलेला अर्ज हा नमुना नसून त्यात पब्लिशर्स पुस्तक विक्री करत आहेत. म्हणूनच की काय अर्ज फेटाळण्यात आला.
 
 सुनावणीदरम्यान विक्रेत्याने आपल्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाने दावा केला होता की, विश्व हिंदू परिषदेने प्रकाशित केलेली पुस्तके संवेदनशील आहेत. या पुस्तकांमुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून त्याने नकार दिला असल्याचा दावा केला होता. याप्रकरणाची पुढील सुनावणी ही २० जानेवारी २०२५ रोजी होणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0