पाकिस्तानी महिला ९ वर्षांपासून भारतात करत होती शिक्षिकेची नोकरी

18 Jan 2025 14:26:26
 
Uttar Pradesh
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेलीमध्ये एका पाकिस्तानी महिलेने शिक्षण विभागाच्या डोळ्यात धूळ फेकली आहे. बनावट कागदपत्रांचा अधार घेत तिने ९ वर्षे सरकारी शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षिका म्हणून काम केले आहे. संबंधित पाकिस्तानी शिक्षिकेचे नाव हे शुमायला खान असे असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण फतेहपूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले.
 
बनावट कागदपत्रांचा आधार घेत सहाय्यक शिक्षिकेची नोकरी मिळवणाऱ्या पाकिस्तानी महिलेविरूद्ध एफआरआय नोंदवण्यात आला आहे. शुमायला खान हिने बनावट प्रमाणपत्रांच्या अधारे प्राथमिक शिक्षण विभागामध्ये शासकीय शाळा माधापूरमध्ये सहाय्यक शिक्षिकेची नोकरी मिळवल्याचा आरोप करण्यात आला.
 
शुमायला खानने माधोपूरमधील प्राथमिक शाळेमध्ये ९ वर्षे शिक्षिका म्हणून कार्यरीत होती. तिने सदर केलेले रहिवासी प्रमाणापत्र हे बनावट असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. शुमायला खानचे आई-वडील पाकिस्तानी नागरिक असल्याचे तक्रारीची चौकशी करणाऱ्या स्थानिक गुप्तचर युनिट पथकाला आढळून आले. संबंधित बनावट कागदपत्र हे उपजिल्हा दंडाधिकारी कार्यालयातून जारी करून दिले होते. आता त्यांनी शुमायला ही पाकिस्तानी महिला असल्याची माहिती सांगितली आहे.
 
तपासादरम्यान, उपजिल्हा दंडाधिकारी यांनी रामपूर यांच्या अहवालामध्ये शुमालया खानने चुकीची माहिती मिळवून देऊन रहिवासी प्रमाणपत्र दिले होते. मात्र याप्रकरणाचा खुलासा होताच प्रमाणपत्र बनावट कागदपत्र रद्द करण्यात आले. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शुमायला खान यांना ३ ऑक्टोबर २०१४ रोजी निलंबन केले. फतेहगंज पोलिसांनी संबंधित पाकिस्तानी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0