"२४ तासांत पुन्हा इस्लाम धर्म स्वीकार नाहीतर...", अहिंदू दाम्पत्याने हिंदू धर्मांतरण केल्याने जीवे मारण्याची धमकी

18 Jan 2025 15:29:04

Conversion
 
भोपाळ : मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील एका मुस्लिम जोडप्याने १४ जानेवारी २०२५ रोजी स्वेच्छेने हिंदू धर्मांतरण (Conversion) केल्याची घटना घडली. हिंदू धर्मात धर्मांतरण केल्याने दाम्पत्यांना घरमालक धमकी देत असल्याचे दाम्पत्यांचे म्हणणे आहे. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाम्पत्यांनी केली आहे. दाम्पत्यांनी धर्मांतरण केल्याने घरमालकाला राग आलाअसल्याची माहिती समोर आली. येत्या २४ तासांत त्याने पुन्हा इस्लाम धर्म स्वीकारला नाही तर जामीनदार त्याला ठार मारेल, अशी धमकी देण्यात आली.
 
यानंतर दोघांनी पोलिसांचा आसरा घेतला. या तक्रारीच्या अधारे पोलिसांनी घरलमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात नवीन खुलासा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,खांडवामधील असलेल्या इम्रानने पत्नीसह हिंदू धर्म स्वीकारला आहे. या दोघांनाही १४ जानेवारी महादेवगडमध्ये पूर्ण विधीपूर्वक सनातन धर्म स्वीकारला होता. पतीने आपले मूळ नाव इम्रान असे नाव बदलत ईश्वर ठेवले. दोघेही खांडवामध्ये भाड्याच्या घरात राहतात. जेव्हा दाम्पत्यांचा घरमालक इफ्तेखारला धर्मांतरण केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तो दाम्पत्याकडे गेला आणि त्याने धमकावले. एवढेच नाही तर घरमालकाने ईश्वरच्या पत्नीशीही गैरवर्तन केले.
 
पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत ईश्वरने सांगितले की, त्याच्या घरमालकाने त्याला २४ तासांत इस्लाम धर्मात परत येण्यास सांगितले. जर तु असे केले नाहीस तर त्यांना ठार करण्याचा इशार देण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणामध्ये संबंधित धमकीदारावर एफआरआय दाखल केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0