सुरत : मुंबईतील एका हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी एक मुस्लिम युवकाने आपले मूळ नाव बदलत हिंदू युवतीसोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा कट रचला. बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपी मुसीबुल शेख प्रदीप क्षेत्रपाल हा हिंदू तरुण असल्याचे सांगत हिंदू तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. बनावट कागदपत्रांच्या आधारे हिंदू नावाचा वापर करणाऱ्या कट्टरपंथीस अटक केली आहे.
सुरत पोलिसांनी याप्रकरणामध्ये लक्ष घालत देशात अवैधरित्या प्रवेश करत अहिंदू घुसखोऱ्यांनी हिंदू नामांतरण करणाऱ्या गुन्हेगारांना अटक केली. त्यावेळी रांदेर परिसरामध्ये वास्तव्यास असणाऱ्या एका कट्टरपंथीने हिंदू तरुणाच्या नावाने बनावट कागदपत्रांद्वारे आपली ओळख लपवली. याप्रकरणात असलेल्या युवकांना पकडण्यासाठी सुरत पोलिसांनी आपले एक वेगळे पथक स्थापन केले आहे.
मुसीबुल उर्फ प्रदीम मकबुल शेख वय वर्षे २६ असून मूळ गाव हे प. बंगाल राज्यातील पूर्वस्थली नवदीप आहे. सध्या तो सुरतमध्ये वास्तव्यास आहे. दरम्यान प्रियसी सितीची त्याच्यासोबत दीड वर्षांआधी मुंबईमध्ये राहणाऱ्या युवकासोबत ओळख झाली होती. यावेळी युवतीसोबत प्रेमविवाहाआधी लिव्ह इन संबंधात राहणे पसंद करत होता. मात्र मुस्लिम असल्याने त्याला कोणी भाडेतत्वावर घर देत नव्हते. यासाठी त्याने बनावट कागदपत्रांचा आधार घेतला होता.
यामुळे तो आता गेल्या पाच वर्षांपासून हिंदू विभागात वास्तव्यास आहे. आरोपींकडून भारतीय ओळखपत्र असलेल्या आधारकार्ड आणि पॅनकार्ड आरसी बुक, मोबाईन क्रमांक जप्त करण्यात आले. याप्रकरणात त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणामध्ये आणखी कोणाची तरी मदत घेत पाऊल टाकले आहे. याप्रकरणाचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू होत आहे.