मुंबई : (Saif Ali Khan) बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींची ओळख अखेर पटली आहे. तसंच त्यांचा ठावठिकाणा माहिती करण्यातही पोलिसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोराचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. पळून जाताना पायऱ्यांवरुन खाली उतरत असतानाचा त्याचा फोटो समोर आला आहे. तसेच आरोपी प्रभादेवी परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे. त्या दिशेने पोलिसांचा शोध सुरु आहे.
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यात वांद्रे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 311, 312, 331(4), 331(6), 331(7) अंतर्गत केला गुन्हा दाखल केला आहे. दरोडा, प्राणघातक शस्त्रांसह दरोडा, घरात बेकायदेशीरपणे घुसणे (हाऊस ट्रेसपास), घरफोडी तसेच रात्रीच्या वेळी घरफोडी करण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.