महाकुंभमेळा अंधश्रद्धा असल्याचा अपप्रचार करणाऱ्यांना साधूंकडून चोप

16 Jan 2025 16:37:41
 
Mahakumbh Mela 2025
 
प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभमेळा २०२५ (Mahakumbh Mela 2025) सुरू आहे. यामुळे अनेक भाविक भक्तगण सामिल झाले आहेत. मात्र असेही काही लोक आहेत ज्यांनी महाकुंभाला अंधश्रद्धा असल्याचे म्हटले आहे. यामुळे आता महाकुंभातील नागा साधू प्रचंड संतापले आहेत. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये काही लोक महाकुंभमेळा बदनाम करत असल्याचे बोलले जात आहे.
 
 
 
व्हिडिओ पाहिल्यानंतर कळते की, व्हिडिओमध्ये कुंभमेळा हा अंधश्रद्धेचा मेळा आणि निमित्त असल्याचे म्हटले. जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर आपली समज जागृत करा, असे संबंधित पोस्टरमध्ये नमूद करण्यात आले होते. हे लोकही रेकॉर्डिंग माईकच्या माध्यमातून अशाच काही गोष्टी सांगत आहेत. यामुळे आता नागा साधूंनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.
 
 
 
दरम्यान, काही लोकांनी कुंभमेळ्याप्रती अपप्रचार करण्याऱ्यांचे सर्व सामान गोळा करण्यास सांगितले. तसेच संबंधित वस्तूंना आग लावण्यास सांगितली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यांना हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठीही काही लोक महाकुंभात येतात आणि अपप्रचार करत असतात.
 
 
 
सोशल मीडियावर नागा साधूंचे कौतुक करण्यात आले होते. हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या महाकुंभात पोहोचल्यानंतर वाईट कृत्य केले. यामुळे अपप्रचार करणाऱ्यांना नागाबाबांनी चोप दिला आहे. दरम्यान संबंधित व्हिडिओची पुष्टी करण्यात आली नाही. 
 
 
Powered By Sangraha 9.0