जीवन संवर्धन संस्थेचा रविवारी १५ वा वर्धापन दिन

16 Jan 2025 21:25:27

Jeevan Samvardhan Foundation
ठाणे : जीवन संवर्धनाचे समाजोपयोगी कार्य करणाऱ्या जीवन संवर्धन फाऊंडेशन संस्थेचा (Jeevan Samvardhan Foundation) १५ वा वर्धापन दिन येत्या रविवारी (ता.१९ जानेवारी) रोजी सायंकाळी ५:३० ते ७:०० या कालावधीत ठाण्यातील हरी निवास बस स्टॉप जवळील जय भगवान हॉलमध्ये होत आहे. अविरत सेवेची पंधरा वर्षे' हे शिवधनुष्य यापुढेही पेलण्याचे बळ प्राप्त व्हावे यासाठी आयोजित केलेल्या आनंद सोहळ्याला भारत सरकार सांस्कृतिक धोरण अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष मा.खा. विनय सहस्त्रबुद्धे हे प्रमुख वक्ते तर पुरुषोत्तम आगवण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती जीवन संवर्धनचे अध्यक्ष सदाशिव चव्हाण आणि निमंत्रक डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी दिली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0