प्लास्टिकमुक्त समाज घडवण्यासाठी एकत्र या!

16 Jan 2025 17:17:16

Ek Thali Ek Thaila Mahakumbh

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ek Thali Ek Thaila Mahakumbh)
प्रयागराज येथे होत असलेला महाकुंभ प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पर्यावरण गतीविधीच्या वतीने 'एक थाली, एक थैला' मोहिम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या आणि स्टीलच्या ताटांचे वितरण करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यांच्या शुभहस्ते महाकुंभ नगर, ओल्ड जी.टी. रोड, सेक्टर १८ येथे नुकताच मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्लास्टिकमुक्त समाज घडवण्यासाठी सर्वांना एकत्र यायचे आवाहन डॉ. कृष्णगोपाल यांनी आलेल्या भाविकांना केले.

ते म्हणाले, प्रत्येकाने आपल्या घरामध्ये कापडी पिशव्या वापरण्याची सवय लावा. हा महाकुंभ अध्यात्मिक असण्याबरोबरच समाजाला नवी दिशा देणाराही मोठा कार्यक्रम आहे. यामध्ये 'एक थाली, एक थैला' ही मोहीम समाजाला स्वच्छ पर्यावरण आणि सुरक्षित जीवनाचा संदेश देईल.

पूर्व उत्तर प्रदेश क्षेत्र पर्यावरण गतिविधि संयोजक अजय कुमार यांनी सांगितले की, मेळाव्यात येणाऱ्या भाविकांना कापडी पिशव्या वाटल्या जात आहेत. आतापर्यंत सहा केंद्रांवरून सुमारे ७० हजार पिशव्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय देशभरातून २० लाख स्टील प्लेट्स आणि ग्लासेस गोळा करण्यात आले आहेत. जे सर्व ठिकाणी सुरू असलेल्या भंडारे आणि भोजनाालयांत वितरीत केले जात आहे.

Powered By Sangraha 9.0