अलाहाबाद : एका अहिंदू युवतीने एका हिंदू युवकासोबत प्रेमसंबंध ठेवला. दोघेही लिव्ह इन (live in relationship) संबंधात राहत होते. दोघांमध्ये शारीरिक संबंध ठेवल्याने त्यांना अपत्य जन्माला आले. काही काळानंतर विवाहबद्ध महिलेने आपल्याच हिंदू पतीवर बलात्काराचा आरोप लावला होता. याप्रकरणामध्ये एकूण ५ लाख रूपये रक्कम द्यावे लागतील अशी अट घातली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. गुन्हा दाखल कऱणारी महिला आणि आरोपी दोघेही नवजात मुलासोबत शांततेने राहत सुखाचा संसार करतील या अटीवर हा निर्णय देण्यात आला आहे. दोन्हींकडून एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त करताना किरकोळ वादातून हे प्रकरण घडल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. या वस्तुस्थितीच्या आधारे हा निर्णय देण्यात आला आहे.
खटल्यातील दोन्ही पक्ष हे जाणते आणि समजूतदार आहेत. दोघांचा धर्म भिन्न असून हे लोक काही काळ लिव्ह इन नातेसंबंधामध्ये होते. यादरम्यान, त्यांना एका मुलगी झाली आहे. यानंतर महिलेने आपल्या पतीवर गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता.
एका रिपोर्टनुसार, महिलेने भारतीय संहितेच्या कलम ३७६, ३२३, ५०४ आणि ५०६ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तसेच आरोपीने माझ्यासोबत विवाह करण्यासाठी नकार दिला असल्याचा आरोप तिने केला. याप्रकरणात जामीन मिळावा यासाठी अतुलने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. तसेच किरकोळ वादातून युक्तीवाद करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली. त्यावेली त्याने आपण मुलीचे वडील असल्याचे सांगितले. आपण लिव्ह इन नातेसंबंध असलेल्या व्यक्तीसोबत विवाह करणार आहे.
यानंतर आता महिलेने होकार दिला. जामीन मंजूर करण्यासोबतच न्यायालयाने आरोपीसमोर काही अटी आणि शर्थी ठेवल्या होत्या. सुटकेनंतर त्याने विवाहासाठी अर्ज करावा, मुलीची काळजी घ्यावी, ५ लाख रूपये फिक्स डिपॉझिट करावे लागतील. न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशातून बाहेर कुठेही जाता येणार नाही.