जामा मशिदीखाली ३०० वर्षांपूर्वीचे पुरातनकालीन शिव मंदिर", पंडित केशवदेव गौतम यांचा दावा

16 Jan 2025 15:56:52

Jama Masjid
 
अलीगड : उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये असलेल्या जामा मशिदीच्या (Jama Masjid) खाली मंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. आरटीआय कार्यकर्ते पंडित केशवदेव गौतम यांनी संबंधित मंदिर ३०० वर्षांपूर्वीचे पुरातनकालीन असल्याचा दावा केला. याप्रकरणात त्यांनी दिवाणी न्यायधीश न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी ही १५ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे.
 
याचिका दाखल केल्यानंतर जामा मशीद ही चर्चेचा विषय ठरत आहे. अशा स्थितीमध्ये हिंदू पक्षातील केशवदेव गौतम यांनी सांगितले की, पूर्वी शहरामध्ये उपरकोट परिसरामध्ये मोठा किल्ला होता. ते म्हणाले की, किल्ल्याच्या जागी आता बनावट कागदपत्रांसह जामा मशीद उभारण्यात आली आहे. त्यांनी याप्रकरणामध्ये एएसआयकडून माहिती मागवली. ज्यात शिवमंदिर, जैन आणि बैद्ध अवशेषांची चर्चा करण्यात आली आहे,
 
मशिदीच्या जमिनीबाबत महापालिकेकडे याचे संबंधित कोणतेही उत्तर नाही. संबंधित जामा मशीद ही शासकीय जमिनीवर बांधलेली मशीद मानली जाते. मुस्लिमांनी दावा केला होता की, संबंधित मशीद ही १८ व्या शतकात बांधण्यात आली होती. याप्रकरणामध्ये प्रोफेसर मुशर्रफ हुसेन यांनी एका माध्यमाशी बोलत असताना जामा मशिदीचा थोडक्यात इतिहास सांगितला.
 
दरम्यान प्रोफेसर मुशर्रफ मेहजर हुसैन यांनी जामा मशिदीबाबत सांगितले की, ही मशीद एका उंच ढिगाऱ्यावर बांधण्यात आली होती. या मशिदीला १७ दरवाजे आणि ३ घुमट बसवण्यात आले आहेत. दरम्यान या मशिदीमध्ये रोज ५ हजार लोक नमाज पडत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0