सर्वोच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला तात्पुरता दिलासा!

15 Jan 2025 12:40:48

POOJA KHEDKAR
 
नवी दिल्ली : (Pooja Khedkar) सर्वोच्च न्यायालयाकडून प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. या प्रकरणी १४ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील सुनावणी होईपर्यंत पूजा खेडकरला अटक न करण्याचे आदेश देण्यात आले.
 
सर्वोच्च न्यायालयात खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी पार पडली. त्यावेळी हा निर्णय देण्यात आला आहे. खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रामुळे पूजा खेडकर अडचणीत आहे. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाकडून खेडकरच्या अटकेला अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे.
 
पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयाच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी दि. १५ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. पूजा खेडकर हिच्यावर संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इतर मागासवर्गीय आणि दिव्यांग आरक्षणाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
 
पूजा खेडकरने याचिकेत काय म्हटलंय?
 
"माझी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मी दिव्यांग असलेली अविवाहित महिला आहे. तसेच शारीरिक पडताळणीनंतर माझी नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे अखिल भारतीय सेवा कायदा आणि नियमांनुसार मला संरक्षण मिळते, मी दिव्यांग नाही जोपर्यंत सिद्ध होत नाही, तोपर्यंत मला पुढील संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे", असे सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत तिने म्हटले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0