मुंबई : शिवरायांच्या किल्ल्यावरील पवित्र जल संग्रहित करण्यात येणार असून ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागमार्फत ही मोहिम हाती घेण्यात आली आहे.
आसाम रेजिमेंटच्या १५ वी बटालियन मार्फत हा उपक्रम राबवण्यात आला असून या मोहिमेसाठी शासनातर्फे ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. दि. १५ जानेवारी रोजी सैन्य दिनाच्या निमित्ताने देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हे जल छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या संचालकांकडे सुपूर्द करण्यात येईल.
हे वाचलंत का? - वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलिस कोठडी!
हे जल सायकलिंग ट्रिम ट्रेकिंग मोहिमेद्वारे गोळा करण्यात येईल. १६ दिवसांच्या या उपक्रमात शिवनेरी, सिंहगड, लाल महाल, तोरणा, पुरंदर, प्रतापगड, रायरेश्वर, राजगड आणि रायगड अशा ९ किल्ल्यांवर मार्गक्रमण करण्यात येणार आहे. हे संपूर्ण अंतर सायकलवरून पूर्ण करण्यात येईल.