कोलकाता : कोलकात्याच्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयात ९ ऑगस्ट २०२४ रोजी एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या
अत्याचारामुळे देशात संतापाची लाट उसळली होती. १० ऑग्सट रोजी आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली होती. ८ ऑक्टोबर रोजी सीबीआयने या संदर्भात चार्जशीट दाखल केली. या संदर्भात पुढे आरजी कार महाविद्यालयाचे माजी प्रचार्य संदीप घोष यांना सुद्धा अटक केली होती. आर्थीक गैरव्यवहार प्रकरणात त्यांना अटक झाली होती. अशातच आता येत्या १८ जानेवारीला खटला न्यायालयात सुनावणी होणार असताना, पीडीतेच्या कुटूंबियांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचं ठरवलं आहे.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार आरजी कार अत्याचारप्रकरणात पीडीतेच्या कुटूंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. पीडीतेच्या बाजूने लढणाऱ्या गार्गी गोस्वामी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पीडीतेच्या कुटुंबाने सीबीआयच्या तपासावर नाराजी व्यक्त केली आहे. आर जी कार महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप कार आणि ताला पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिजीत मोंडल यांच्याविरूद्ध आरोपपत्र सादर करण्यात सीबीआय अपयशी ठरल्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे. संदीप घोष अजूनही भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कस्टडीमध्ये असून, गोस्वामी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सीबीआयकडून अनेक साक्षीदारांना वगळण्यात आले आहे.