बीड : (Santosh Deshmukh Murder Case) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणीच्या तपासासाठी १ जानेवारीला स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, काही अधिकाऱ्यांना हटवण्यात आले आहे.
देशमुख कुटुंबियांची मागणी लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर नवे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. नऊऐवजी आता सात जणांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली हेच या नव्या एसआयटी पथकाचे प्रमुख असणार आहेत. आधीच्या एसआयटीवर देशमुख कुटुंबाचा आक्षेप होता. या घटनेतील आरोपी एसआयटीतील अधिकाऱ्यांच्या संपर्कातील होते, असाही आरोप देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आला होता.
नवीन एसआयटी पथक
१) किरण पाटील (अपर पोलिस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर)
२) अनिल गुजर (पोलिस उपअधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, बीड)
३) सुभाष मुठे (पोलिस निरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, बीड)
४) अक्षयकुमार ठिकणे (पोलिस निरीक्षक, भरारी पथक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
५) शर्मिला साळुंखे (पोलिस हवालदार भरारी पथक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
६) दीपाली पवार (हवालदार, सीसीटीएनएस, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
एसआयटीमधून वगळण्यात आलेले अधिकारी :
- सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय जोनवाल
- पोलिस उपनिरिक्षक महेश विघ्ने
- पोलिस उपनिरिक्षक आनंद शिंदे
- सहायक पोलिस उपनिरिक्षक तुळशीराम जगताप
- कर्मचारी मनोज वाघ
- कर्मचारी चंद्रकांत काळकुटे
- कर्मचारी बाळासाहेब अहंकारे