प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. महाकुंभ २०२५ (Mahakumbh) ला सुरूवात झाली असून अशा ठिकाणी अनेक परदेशी नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे. तसेच काही सोशल मीडिया माध्यमांवर सक्रिय असणारे डिजीटल क्रिएटर असणाऱ्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या मथळ्यासाठी महाकुंभ २०२५ चे अनेक चित्रे, दृष्य, व्हिडिओ टीपत आहेत. अशातच आता युट्यूबर्सही याठिकाणी सामिल झाले आहेत महाकुंभ परिसरामध्ये दाखल झाले आहेत.
युट्यूबर्स आपल्या लाईक आणि कमेंटसाठी युट्यूब चॅनल्सवर कंकटे क्रिएट करण्यासाठी वाटेल ते प्रश्न विचारत आहेत. त्यांच्या प्रश्नांना आता महाकुंभमधील साधू संत संतापले आहेत. त्यांना एका चिमट्याद्वारे मारहाण केली आहे. त्यांच्या या कृतीमुळे युट्यूबर्सवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे.
आपले अध्यात्मिक जीवन जगणाऱ्या नागा साधूला एका युट्यूबर्सने अचानकपणे बाबांच्या चेहऱ्याजवळ माईक आणला. यामुळे ऋषी संतापले आणि त्यांनी हातात असलेले मोराचे पंख घेऊन सर्वांचा पाठलाग केला. त्यावेळी एका युट्यूबर्सने एका नागा साधूला विचारले की, आपण कोणत्या प्रकारची भजने गात आहात? नागा साधू आपल्या तंबूतून बाहेर येईपर्यंत साधूने चिमटे काढत युट्यूबर्सवर हल्ला केला.
या प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर अनेक नेटकऱ्यांनी युट्यूबर्सना टोकले आहे. काहींनी हसण्याचे इमोजी शेअर करत युट्यूबर्सची खिल्ली उडवली आहे. तर काहींनी नागा साधूंसोबत असे करू नका असेही सांगत आहे.