"बांगलादेशी क्रिकेटर लिटन दास हिंदू असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर", बासित अली यांचा दावा
14-Jan-2025
Total Views |
ढाका : जगभरात आतापासूनच चॅम्पियन्स ट्रॉफीची एकच चर्चा सुरू झाली आहे. याचपार्श्वभूमीवर सर्वच संघ आपला घाम गाळत आहेत. संबंधित संघांचे खेळाडू निवडकर्तेही खेळाडूंच्या कामगिरीला घेऊन चर्चा करत आहेत. अशातच आता बांगलादेशही या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सामिल आहे. मात्र बांगलादेश संघात लिटन दासला संधी न दिल्याची माहिती समोर आली आहे. लिटन दास विरोधात धार्मिक मतभेद करण्यात आल्याचे पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी वक्तव्य केले आहे.
लिटन दासने नुकतेच एक शतकही ठोकले होते. मात्र तो अल्पसंख्यांक हिंदू असल्याने त्याला बांगलादेश खेळाडू निवडकर्त्यांनी वगळले आहे. बासित म्हणाले की, लिटन दासला कोणत्या आधारावर संघातून वगळण्यात आले? असा त्यांनी सवाल केला. तसेच निवडकर्त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे लिटन दासवर अन्याय झाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
लिटन दासशिवाय बांगलादेश संघ अपूर्ण आहे असेही बासित म्हणाले. या निर्णयावर त्यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष फारूक अहमद यांना सवाल केला. त्यामुळे आता सध्या बांगलादेशातील सुरू असलेल्या हिंदूंवरील अन्याय अत्याचाराचे राजकारण आणि त्याचे पडसाद हे खेळातही दिसत आहेत.
दरम्यान लिटन दासने अलीकडेच बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ५५ चेंडूमध्ये १२५ धावांची तुफानी खेळी साकारली होती. निवडकर्त्यांच्या निर्णयाचा आदर करत त्यांनी कोणतेही विधान न करता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिलेला निर्णय स्वीकारला आहे.