बीड : (Vishnu Chate) बीड सरपंच संतोष देशमुख ह्त्या आणि अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणांमध्ये अटकेत असणाऱ्या संशयित आरोपी विष्णू चाटेला १८ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ११ जानेवारी रोजी त्याला केज न्यायालयाकडून २ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली होती. दोन दिवसांच्या कोठडीची मुदत आज संपल्याने आरोपी विष्णू चाटेला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी विष्णू चाटेने न्यायालयाकडे आपल्याला लातूरच्या जेलमध्ये ठेवण्याची विनंती केली होती. मात्र, केज न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली आहे. विष्णू चाटेवर या प्रकरणातील इतर आरोपींप्रमाणे मकोका लावण्यात आला आहे. केज न्यायालयात सरकारी वकीलांनी विष्णू चाटे संघटित गुन्हेगारीचा भाग आहे, असे म्हटले होते.