गोमातेचे केस कापणारा कट्टरपंथी सय्यद नसरू अखेर गजाआड

13 Jan 2025 18:34:45
 
गोमाता
 
बंगळुरू : कर्नाटकातील बंगळुरूमध्ये कॉटनपेट पोलिसांनी सय्यद नसरू या कट्टरपंथी आरोपीला ताब्यात घेतले. हिंदू धर्माची माता म्हणून गोईची ओळख आहे. मात्र आता कट्टरपंथी सय्यद नसरूने गोमातेचे केस कापत रक्तबंबाळ अवस्थेत सोडले होते. ही घटना १२ जानेवारी २०२५ रोजी घडली होती. मात्र आता याप्रकरणामध्ये १३ जानेवारी २०२५ रोजी कट्टरपंथी सय्यद नसरूला पोलिसांनी अटक केली आहे. 
 
रविवारी पहाटे चामराजपेठेतील स्थानिकांनी विनायकनगरमध्ये गायींचे केस कापणाऱ्या नसरूविरोधात पोलिसांना सांगितले. यावरून आता कर्नाटक भाजपने कर्नाटक सरकारवर हल्लाबोल केला होता. याप्रकरणी मुख्यमंत्री सीतारामय्या यांनी पोलीस आयुक्तांशी बोलत कठोर कारवाईचे आदेश देण्यास सांगितले.
 
कर्ण नावाच्या व्यक्तीच्या तीन गायी स्थानिकांनी हंबरत असताना पाहिल्या होत्या. बाहेर आल्यानंतर गायी रक्तबंबाळ स्वरूपात दिसत होत्या आणि त्यांचे केस कापले होते. मुक्या जनावरांवर हल्ला करणारा नसरू हा या प्रकरणानंतर घटनास्थळावरून गायब झाला होता. यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरूवात केली. याप्रकरणात पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.  
 
याचपार्श्वभूमीवर कर्नाटक भाजपचे नेते अशोक म्हणाले की, काँग्रेस सरकार हे मतांच्या गोळाबेरीजेसाठी वाट्टेल ते करू लागली आहे. व्होट बँकेच्या राजकारणामुळे आता कट्टरपंथींचा उन्माद वाढत असून त्यांची भीती मरण पावली आहे.  
 
 
Powered By Sangraha 9.0