काशी विश्वनाथ मंदिराच्या परिसरात मांस आणि मद्य विक्रीवर बंदी, ५५ दुकानांना प्रशासनाकडून नोटीस जारी

13 Jan 2025 16:12:20

Kashi Vishwanath
 
काशी : वाराणसीमधील काशी विश्वनाथ (Kashi Vishwanath) मंदिराच्या २ किमी अंतरावरील मांस आणि मद्य विक्रीची दुकाने बंद करण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे. मंदिर परिसराच्या २ किमीच्या सानिध्यातील परिसरामध्ये एकूण ५५ दुकाने असून संबंधित दुकांनांना नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, यातील १० दुकानांवरील नियमाचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणात ३ एफआरआय दाखल करण्यात आल्या आहेत.
 
प्रसारमाध्यमानुसार, डीसीपी-काशी झोन गौरव वांसवाल यांनी सांगितले की, चौक आणि दशाश्वमेध पोलीस ठाण्यामध्ये १० दुकानांविरोधात तीन एफआरआयची नोंद करण्यात आली आहे. ज्यात बीएनएसच्या कलम २२३, कलम ३२५ अंतर्गत कारवाई केली जात आहे.
 
दुकानदारांनी नुकतीच याप्रकरणी वाराणसीच्या महापौरांची भेट घेतली होती. सोमवारी १३ जानेवारी २०२५ रोजी कट्टरपंथींच्या दुकानदारांवर पुन्हा एकदा महापौर यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित दुकाने ही अन्य ठिकाणी स्थलांतरीत करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. पालिका प्रशासनास कोणत्याही व्यक्तीच्या पोटावर पाय आणायचा नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
 
गेल्या वर्षी वाराणसी महापालिकेने निर्णय घेतला होता की काशी विश्वनाथ मंदिराच्या २ किमी भागातील सर्व मांस आणि मद्य विक्रीची दुकाने हटवली जातील.
 
Powered By Sangraha 9.0