हिंदू धर्माच्या गोमातेचे केस कापत अज्ञातांकडून हल्ला

12 Jan 2025 20:24:58
 
Hindu cow
 
बंगळुरू : कर्नाटक राज्याची राजधानी बंगळुरूमध्ये हिंदू धर्माच्या गोमातेवर हल्ला करण्यात आला आहे. गोमातेचे केस कापत त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत सोडण्यात आले. स्थानिकांनी गोमाता हंबरताना पाहिले. हल्लेखोरांची अद्यापही ओळख पटली नसल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर बंगळुरूमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर आता भाजपने काँग्रेस सरकारवर टीकेचे अस्त्र डागले आहे. ही घटना रविवारी दि : १२ जानेवारी रोजी घडली होती.
 
प्रसारमाध्यमानुसार, ही घटना बंगळुरूमधील चामराजपेटमध्ये घडली. कर्ण नावाच्या व्यक्तीच्या तीन गायी हंबरत असताना स्थानिकांना आढळल्या. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्या गायी जखमी झाल्या असल्याचे दिसून आले. याप्रकरणात आरोपीची ओळख पटलेली नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर परिसरामध्ये संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणामध्ये पोलिसांना कळवण्यात आले आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. 
 
या घटनेची माहिती मिळताच हिंदू लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचल्याची माहिती समोर आली. त्यांनी या कारवाईची मागणी केली असता कर्नाटक भाजपने काँग्रेस सरकारवर टीका केली. काँग्रेस सरकार गोमातेबद्दल निष्काळजी असल्याचे विजेंद्र यांनी म्हटले आहे. 
 
याप्रकरणी आता भाजप नेते आणि कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते अशोक यांनी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या प्रकरणाची माहिती जाणून घेतली. ते म्हणाले की, बेंगळुरूच्या चामराजपेटमधील विनायक नगरमध्ये गाईचे केस कापण्यात आल्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. याप्रकरणात आता सरकारने गाईचे केस कापणाऱ्या आरोपीला अटक करावी अशी सरकारकडे मागणी केली आहे. अशी जिहादी मानसिकत देशात कधीही पाहिली नसल्याचे ते म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0