मोठी बातमी! विष्णू चाटेला २ दिवसांची CID कोठडी

    11-Jan-2025
Total Views |
 
vishnu chate
 
बीड : (Vishnu Chate) बीड हत्येप्रकरणी विष्णू चाटेला शुक्रवार दि. १० डिसेंबर रोजी खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली होती. मात्र विष्णू चाटेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणी ताबा मिळवण्यासाठी एसआयटीने रीतसर अर्ज केला होता. त्यासंदर्भातील सुनावणीकरिता आज त्याला पुन्हा केज न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी वकीलांकडून विष्णू चाटेच्या सीआयडी कोठडीची मागणी करण्यात आली होती. ही मागणी न्यायालयाकडून मंजूर करण्यात आली असून विष्णू चाटेला २ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
विष्णू चाटेवर देखील या प्रकरणातील इतर आरोपींप्रमाणे मकोका लावण्यात आला आहे. केज न्यायालयात सरकारी वकीलांनी विष्णू चाटे संघटित गुन्हेगारीचा भाग आहे, असे म्हटले आहे. तसेच विष्णू चाटे हा तपासयंत्रणांना तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचेही सरकारी वकीलांनी सांगितले होते. त्यामुळे आता विष्णू चाटेची रवानगी सीआयडी कोठडीत करण्यात आली आहे.