"केजरीवाल हे जनतेची दिशाभूल करत आहेत!"

11 Jan 2025 15:32:01

kjp (1)

नवी दिल्ली : दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. अशातच आता आम आदमी पक्ष मतपेटीच्या राजकारणासाठी जातीजातींमध्ये वैमान्सय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या प्रचाराच्या दरम्यान आम आदमी पक्षाने असा दावा केला की केंद्रातील भाजप सरकारने जाणीवपूर्वक जाट समुदायाचे नाव ओबीसींच्या यादी समाविष्ट केलेले नाही. केजरीवाल यांच्या याच दाव्याचे खंडन करत भाजपने म्हटले की केजरीवाल हे जनतेची दिशाभूल करीत आहेत. गेल्या १० वर्षात दिल्लीच्या विधानसभेत या बद्दल कुठल्याही प्रकारची झालेली नाही.
 
भाजपच्या लोकसभेच्या खासदार कमलजीत सेहरावत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की आरक्षण हा मूळात राज्य सरकारच्या आखत्यारीतला विषय आहे. आम आदमी पक्षाला जर का खरंच जाट समुदायाचे भलं करायचं होतं तर दिल्लीच्या विधानसभेत त्यांनी हा विषय मांडला असता. परंतु त्यांना केवळ मतपेटींच्या राजकारणात रस आहे असं मत सेहरावत यांनी मांडलं. १० जानेवारी रोजी अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला पत्र लिहीले की जाट समुदायाला आरक्षण देण्यास ते अपयशी ठरले आहेत. भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

'आप'ची निष्क्रीयता कारणीभूत!
सेहरावत यांनी म्हटले की " कैलाश गेहलोत इतकी वर्ष आम आदमी पक्षामध्ये होते. त्यांनी वारंवार जाट समाजाच्या आरक्षणासाठी प्रक्रीया सुरू करण्याची विनंती केली. परंतु केजरीवाल आणि त्यांचा पक्षाने काहीच हालचाल केली नाही. दुसऱ्या बाजूला भारतीय जनात पक्षाने वारंवार जाट समुदायाला आरक्षण मिळावे म्हणून मागणी केली होती.

Powered By Sangraha 9.0