"जो बायडेन यांचा सत्ताकाळ सेन्सॉरशिपचा!"

मार्क झुकेरबर्ग यांचे प्रतिपादन

    11-Jan-2025
Total Views |

mb 1 (1)

वॉशिंग्टन डीसी : जो बायडेन यांच्या सत्ताकाळात आम्हाला असंख्य अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यांच्या प्रशासनतील अधिकारी आम्हाला कॉल करून शिवीगाळ करायची, आमच्यावर आरडाओरड करायचे. कधी कधी असं वाटायचं की हुकूमशाहीचा काळ सुरू आहे की काय" असे मत व्यक्त केलं आहे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी. जो रोगन यांच्यासोबत पॉडकास्टवर बोलताना झुकेरबर्ग यांनी या संदर्भातील माहिती उघडकीस आणली.
 
जो रोगन यांच्यासोबत पॉडकास्टवर बोलताना झुकेरबर्ग यांनी या संदर्भातील माहिती उघडकीस आणली. मेटा या कंपनीने नुकतचं पक्षपाती फॅक्ट चेकर्सला बाजूला करत कम्युनिटी गाईडलाइन्सचा पर्याय फेसबुक आणि इन्सटाग्रामवर सुरू केला आहे. फॅक्ट चेकर्सच्या वाढणाऱ्या हस्तक्षेपावर पर्याय म्हणून कम्युनिटी गाईडलाइन्सचा पर्याय निवडला गेला. कुठल्याही प्रकारचे कारण नसताना विशिष्ठ गटांच्या पोस्ट जाणीवपूर्वक सेन्सॉर केल्या जात होत्या. बायडेन प्रशासनाचे वास्तव जगासमोर मांडताना झुकेरबर्ग म्हणाले की " आम्हाला बायडेन यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा फोन येत असे. त्यांचे अधिकारी आम्हाला शिवीगाळ करायचे." जो रोगन यांनी यासंदर्भात पुराव्याची मागणी केली असता, मार्क झुकेरबर्ग म्हणाले की या संबंधित सर्व फोन रेकॉर्ड आणि ईमेल उपल्बध आहेत. कोवीडच्या काळात बायडेन यांच्या त्यांनी मेटा बद्दल अनेक वादग्रस्त विधानं केली. कोवीडकाळात आणि नंतर प्रसारमाध्यमांमध्ये अनेक बदल झाले. सोशल मीडीयाच्या माध्यमातून लोकांना मिळणाऱ्या माहितीचा ओघ वाढला. अशातच फॅक्ट चेकर्स यांचा पक्षपातीपणा दिवसेंदिवस वाढतच गेला. त्यांच्यावर अंकुश असायला हवा असा विचार आम्ही केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात नवीन सरकार आल्यामुळे आम्हाला हा निर्णय घेण्यासाठी योग्य ते वातावरण तयार झाले असे मत मार्क झुकेरबर्ग यांनी व्यक्त केले.