अंकिताच्या घरी ‘ती’ आलीच! ‘कोकण हार्टेड गर्ल’ने खरेदी केली आलिशान कार
11-Jan-2025
Total Views |
मुंबई : मराठी ‘बिग बॉस सीझन ५’ मधील सदस्य अंकिता वालावलकर सध्या चांगलीच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तिने अखेर लग्नगाठ बांधणार असल्याचे जाहिर करत होणाऱ्या नवऱ्याचा फोटो आणि नाव सांगितलं होतं. गीतकार कुणाल भगत याच्यासोबत कोकण हार्टेड गर्ल लवकरच लग्न बंधनात अडकणार असून तिने नुकतीच आणखी एक आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे.
अंकिता वालावलकर हिने शानदार ऑडी विकत घेतली असून खास कॅप्शन देत तिने सोशल मिडियावर फोटो पोस्ट केले आहेत. अंकिताने 'आवडी आली' असं लिहित नव्या गाडीची बातमी लोकांपर्यंत पोहोचवली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अंकिताने तिची लग्नाची तयारी सुरु झाल्याची माहिती साडी खरेदी करण्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली होती. तसेच, अंकिता आणि कुणालच्या लग्नाची केळीच्या पानाच्या डिझाईनची निराळी लग्नपत्रिका देखील चर्चेत आहे. त्यामुळे, येत्या फेब्रुवारी महिन्यात अंकिता आणि कुणाल लग्नगाठ बांधणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.