मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP Program in Mahakumbh) उत्तर प्रदेशच्या प्रयागरराज येथे महाकुंभाला सुरुवात होत आहे. जगभरातून सनातन हिंदू परंपरेचे लाखो संत एकत्र येत आहेत. या महाकुंभात सनातनचा विजय निश्चित करण्यासाठी आणि सनातनसमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी ते समाजाला चर्चा करून मार्गदर्शन करतील, याबाबत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री बजरंगलाल बगरा यांनी माहिती दिली. त्यानिमित्ताने विश्व हिंदू परिषदेची केंद्रीय मार्गदर्शक मंडल बैठक (२४ जानेवारी), साध्वी संमेलन(२५ जानेवारी), संत समेलन(२५ व २६ जानेवारी), युवा संत समेलन(२७ जानेवारी) असे विविध कार्यक्रम ऋषी भारद्वाज आश्रम, जुना जीटी रोड, सेक्टर १८, कुंभमेळा परिसरात आयोजित केले जाणार आहेत.