दिल्ली दंगलप्रकरणात ताहिर हुसेनचे कनेक्शन, निवडणूक लढण्यासाठी जामीनाची मागणी
11-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये झालेल्या २०२० च्या हिंदूविरोधात केलेल्या दंगलीप्रकरणात असलेले आम आदमी पक्षाचे माजी नगरसेवक ताहिर हुसेन यांनी जामीनाची मागणी केली. ताहिर हुसेन आता एमआयएम पक्षामध्ये सामील झाले आहेत. एमआयएमने दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुस्तफाबाद मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. यानंतर त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये अंतरिम जामीनासाठी याचिका दाखल केली. ताहिर हुसेन यांनी याचिकेत १४ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वेळ मागितला. जेणेकरून ते निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील.
संबंधित याचिकेवर सुरुवातीला न्यायमूर्ती अमित शर्मासमोर सुनावणी होणार असल्याची माहिती होती. मात्र त्यानंतर या खटल्यातून स्वत:ला माघार घेतली. यानंतर तो न्यायमूर्ती नीना बंसल कृष्णा यांच्या न्यायालयामध्ये पाठवण्यात आला. पण त्यावर सुनावणी होऊ शकली नाही. आता याप्रकरणामध्ये १३ जानेवारी रोजी सुनावणी करण्यात येणार आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणाचा हवाला दिला ताहिर हुसेन यांनी एक युक्तीवाद केला की, चार वर्षे आणि नऊ महिने तुरुंगात आहे आणि आतापर्यंत केवळ २० फिर्यादी साक्षीदारांनी खटल्यात साक्ष दिली. एकूण साक्षीदारांची संख्या ही ११४ असल्याची माहिती समोर आली आहे, याचिकेदरम्यान हुसेन म्हणाले की, निवडणूक प्रचार प्रक्रियेचा भाग बनणे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. त्यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा जुन्या निर्णयाचा हवाला दिला आहे. ज्यात आप नेते अरविंद केजरीवाल यांना २०२४ वर्षी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला होता.
हुसेन यांच्यावर दिल्ली दंगलीदरम्यान इंटेलिजेन्स ब्युरो अधिकारी अंकीत शर्मा यांच्या हत्येचा आरोप करण्यात आला. २०२० ईशान्य दिल्ली दंगलीदरम्यान शर्माचा मृतदेह हा खुजरी खास नाल्यामध्ये सापडला होता. त्याच्या शरीरावर असंख्य जखमांच्या खुणा दिसत होत्या. याप्रकरणामध्ये अंकीत शर्माचे वडील रविंदर कुमार यांनी आपला मुलगा बेपत्ता असल्याची माहिती सांगितली आहे. याप्रकरणाचा आरोप हा हुसेन यांच्यावरती करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, हुसेनला त्याच्यावर दाखल करण्यात आलेल्या एकूण १२ पैकी ९ गुन्ह्यांना जामीन मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, तो अजूनही ३ प्रकरणांमध्ये कोठडीत आहे. ज्यात ईडीने मनी लॉन्ड्रिगप्रकरण तसेच दिल्लीत झालेल्या दंगलीशी कनेक्शन असल्याचा कट यामध्ये समावेश करण्यात आला आहे.