साईनगरी शिर्डीत भाजपचे भव्य अधिवेशन! केंद्रीय नेतृत्व करणार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

    11-Jan-2025
Total Views |

BJP 
 
शिर्डी : विधानसभा निवडणूकीतील अभूतपुर्व यशानंतर रविवार, १२ जानेवारी रोजी साईनगरी शिर्डी येथे भाजपचे एक दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने हे अधिवेशन महत्वाचे मानले जात आहे.
 
शिर्डी येथे होणाऱ्या या अधिवेशनात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात सुमारे १५ हजारांहून अधिक पदाधिकारी उपस्थित राहणार असून केंद्रीय नेतृत्व त्यांना मार्गदर्शन करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार या अधिवेशनात उपस्थित असतील.
 
हे वाचलंत का? -  "महाविकास आघाडी एकत्र लढणार, वेगळी लढणार..."; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
 
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर अधिवेशनाच्या तयारीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या दृष्टीने हे अधिवेशन महत्वाचे ठरणार आहे. या अधिवेशनात निवडणूकीची रणनिती ठरण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.