पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षेपूर्तनिमित्त महाराष्ट्रातील शाहीरांच्या शाहिरी रचनांचा अर्थात पोवाडे (संग्रह) ग्रंथासाठी सर्व शाहीरांनी आपले स्वरचित पोवाडे/शाहिरी रचना पाठवण्याचे आवाहन समितीचे वतीने अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी केले आहे. १४ जानेवारी पर्यंत शाहीरांनी ‘शाहिरी भवन गुरुकुल, ४०१ नटराज वत्स, १५२ सोमवार पेठ, पुणे ४११०११’ या पत्त्यावर आपल्या रचना पाठवायच्या आहेत. निवडक पोवाड्यांचा समावेश शाहिरी ग्रंथात होईल.
श्री छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे पराक्रमी मावळे आणि श्री शिवराज्याभिषेक या विषयावरील २ पोवाडे किंवा शाहिरी रचना पाठवायच्या आहेत. पोवाडे पाठवताना डी.टी.पी. करून पाठवावेत, शिवाय त्याची एक पी.डी. एफ. फाईल व्हॉट्सएपवर व मेल करावी, पोवाडे स्वरचित असावेत आणि शाहिरी ग्रंथात आपल्या रचनांचा समावेश करण्याचा अधिकार समितीकडे असेल असे यासाठीचे काही नियम आहेत. अधिक माहितीसाठी आणि सहभागी होण्यासाठी ९४२२०२९२४७ या क्रमांकावर संपर्क साधावा.