सावरकरांवर खोटे आरोप करणाऱ्या राहुल गांधींना जामीन मंजूर

    11-Jan-2025
Total Views |

Rahul Gandhi
 
नवी दिल्ली : पुण्यातील विशेष न्यायालयाने शुक्रवारी १० जानेवारी २०२५ रोजी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधात टीप्पणीवरून जामीन मंजूर केला. सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्यावर फौजदारी मानहानीचा गुन्हा दाखल करण्यास सांगितला. सुनावणीदरम्यान, राहुल गांधी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले गेले होते. याप्रकरणी आता राहुल गांधींना २५ हजार रुपयांच्या जातमुचलकावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 
 
राहुल गांधी यांनी मार्च २०२३ मध्ये लंडनमध्ये भाषण करत असताना त्यांनी सावरकरांवर भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, सावरकरांनी एका पुस्तकात लिहिले होते की, त्यांनी आणि त्यांच्या काही मित्रांनी एकदा एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केल्याने त्यांना आनंद झाला होता. यावर सत्यकी यांनी हा दावा फेटाळून मानहानीची मागणी केली होती.
 
सत्यकी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, राहुल गांधी जाणीवपूर्वक सावरकरांवर खोटे आणि बदनामीकारण आरोप करत आहेत. त्यामुळे सावरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागला. याप्रकरणी पुढील सुनावणी १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार म्हणाले की, न्यायालयाने राहुल गांधींना न्यायालयीन तारखेस वैयक्तिकरित्या हजर राहण्यापासून दिलासा मिळाला आहे.