योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

11 Jan 2025 19:05:35
 
Yogi Adityanath
 
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा गळा चिरत महाकुंभमेळा होऊ न देण्याची सोशल मीडियावर धमकी देण्यात आली आहे. मैजान रझा असे धमकी देणाऱ्या कट्टरपंथी युवकाचे नाव असून त्याला उत्तर प्रदेशातील बरेली पोलिसांनी अटक केली. हिंदू संघटनेच्या सदस्यांनी मैजानवर कठोर कारवाईची मागणी केली होती. शनिवारी ११ जानेवारी २०२५ रोजी पोलिसांनी बरेलीमधील लोको वसाहतीतून अटक करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मैजान रझाने शनिवारी त्याच्या फेसबुकवर दोन आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या होत्या. पहिल्या परिच्छेदात त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. २०२५ मध्ये तर त्यांना मारहाणीची धमकी दिली आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये मैजानने प्रभू श्रीरामाबाबत वादग्रस्त विधान केले. हे वर्ष अयोध्येतील त्यांच्या जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या मंदिराचे शेवटचे वर्ष असल्याचे त्याने पोस्टमध्ये नमूद केले.
 
 
 
या पोस्टवर वादंग उठले असून हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप घेत कठोर कारवाईची मागणी केली. मैजान रझाला अटक करण्यात आल्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0