जन्म दाखला घोटाळ्याची पाळेमुळे अमरावतीतील अंजनगाव सुर्जी तालुक्यापर्यंत!
11-Jan-2025
Total Views |
मुंबई : मालेगाव येथे बाांग्लादेशी आणि रोहिंग्यांना देण्यात आलेला जन्म दाखल्याचा घोटाळा चौकशीच्या फेऱ्यात असताना आता अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातही या घोटाळ्याची पाळेमुळे सापडली आहेत. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या सोमवार, १३ जानेवारी रोजी अंजनगाव सुर्जी येथे जाणार आहेत.
मालेगाांव येथे वर्षभरात सुमारे १ हजार घसुखोर बाांगलादशी व रोहिंग्या मुसलमानांना भारतीय असल्याचा दाखला देण्यात आला आहे. मालेगाव तहसील कार्यालय आणि मालेगाव महापालिकेतर्फे त्यांचा जन्म मालेगावात झाल्याचे जन्माचे दाखले देण्यात आले. त्यानंतर आता अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे हा घोटाळा उघडकीस आला आहे.
२०११ च्या जनगणनेप्रमाणे अंजनगाव सूर्जी तालुक्याची लोकसंख्या १ लाख ६० हजार ९०३ इतकी आहे. यापैकी २८ हजार १८० मुस्लिम लोकसंख्या आहे. दरम्यान, गेल्या ६ महिन्यात जन्माच्या दाखल्यासाठी १ हजार ४५० हून अधिक अर्ज आले असून त्यात १४०० अर्ज हे बांग्लादेशी रोहिंग्यांचे असल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीसुद्धा स्थापन करण्यात आली आहे.