मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार!

11 Jan 2025 19:36:01
 
Fadanvis
 
नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार आहेत. पानिपत शौर्य समितीचे आयोजक प्रदीप पाटील यांनी शनिवार, ११ जानेवारी रोजी महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.
 
हे वाचलंत का? -  साईनगरी शिर्डीत भाजपचे भव्य अधिवेशन! केंद्रीय नेतृत्व करणार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
 
१४ जानेवारीला पानिपतच्या युद्धाला २६४ वर्ष पूर्ण झाले आहेत. वर्ष १७६१ मध्ये झालेल्या अब्दाली आणि मराठ्यांच्या ऐतिहासिक युद्धातील वीरगती प्राप्त मराठ्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी १४ जानेवारीला पानिपत येथे शौर्य स्मारक दिन साजरा केला जातो. मागील १९ वर्षांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाला यंदा राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह राज्यातील इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आयोजक प्रदीप पाटील सांगितले. सकाळी १० वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र, दिल्ली, आणि पानिपत येथून मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहतील. या कार्यक्रमासाठी यंदा ऑस्ट्रेलियातूनही काही नागरिक येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0