श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेचा पहिला वर्धापन दिन; अयोध्यानगरीत वर्षभरात काय बदल झाले?

    11-Jan-2025
Total Views |

Ayodhya Ramlala

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ayodhya Ramlala Pranpratishtha) 
अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराचे निर्माणकार्य प्रगतीपथावर आहे. गेल्या वर्षी २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उस्ताहात संपन्न झाला आणि प्रभु श्रीराम गर्भगृहात विराजमान झाले. आज प्रतिष्ठा द्वादशी (तिथीप्रमाणे) पहिला वर्धापन दीन. त्यामुळे संपूर्ण अयोध्येनगरीत तीन दिवसीय जयंती सोहळ्याला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षभरात शहरातील विकासकामे, पर्यटक आणि भाविकांच्या आगमनात कमालीची वाढ झाल्याची नोंद आहे.

हे वाचलंत का? : महाराष्ट्रातील ५ स्टार्टअप्सचा टेकएक्सपेडाइटच्या अंतिम यादीत समावेश


मिळालेल्या एका वृत्तानुसार, एका वर्षात साधारण ३.५० कोटी भाविक राम मंदिरात पोहोचले. राम मंदिराच्या उभारणीनंतर अयोध्या हे देशातील धार्मिक पर्यटनाचे सर्वात मोठे केंद्र बनले असून येथे दररोज हजारो भाविक येत आहेत. तसेच वर्षभरात सरासरी ३६३ कोटी रुपयांची देणगी जमा झाल्याचे श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले. तसेच २० किलो सोने आणि १३ क्विंटल चांदीही श्रीरामाचरणी अर्पण केल्याचे सांगितले.
 
अयोध्येत रामपथ, भक्तीपथ, राम की पायडी, मंदिराच्या मॉडेलवरील रेल्वे स्टेशन अयोध्येची अभिमानास्पद ओळख निर्माण करत आहेत. अयोध्येतील रामपूर हरवरा येथील सरायरासी गावात स्थापन करण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाने २० मेगावॅट वीज निर्मिती सुरू केली असून त्यामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्ते सौरऊर्जेवर चालणाऱ्या एलईडीने उजळले आहेत. राम मंदिराच्या निर्मितीनंतर अयोध्येच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मालमत्तेच्या किमती १० पटीने वाढल्या आहेत. गुंतवणूकदारांची वाढती आवड आणि विकास प्रकल्प यामुळे हे क्षेत्र वेगाने विकसित होत आहे.

राम मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्येत पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत जवळपास ११ कोटी पर्यटकांनी अयोध्येला भेट दिली. त्यामुळे हॉटेल आणि इतर व्यवसायांना मदत झाली आहे. अयोध्येच्या विकासाच्या केंद्रस्थानी एकमेव राम मंदिर आहे. त्यामुळे आता अयोध्येची प्रगती थांबणार नाही, हे निश्चित असा विश्वास स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.