महाराष्ट्रातील ५ स्टार्टअप्सचा टेकएक्सपेडाइटच्या अंतिम यादीत समावेश

महाराष्ट्र सरकार उद्योग संचालनालय आणि गेम्स २४ बाय ७ यांच्यात करार

    10-Jan-2025
Total Views |

tec
 
 
 
 
मुंबई : गेम्स २४ बाय ७ ने सध्या त्यांच्या सुरु असलेल्या एक्सिलरेटर प्रोग्राम टेकएक्सपेडाइटच्या अंतिम यादी नुकतीच जाहीर केली. यात देशभरातून १७ स्टार्टअप्स निवडण्यात आले असून त्यात महाराष्ट्रातील ५ स्टार्टअप्सचा समावेश आहे. यावेळी महाराष्ट्र सरकार उद्योग संचालनालय आणि गेम्स २४ बाय ७ यांच्यात महाराष्ट्रातील वाढत्या स्टार्टअप इकोसिस्टिमला चालना देण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी करार करण्यात आला.
 
 
महाराष्ट्रातून निवडल्या गेलेल्या स्टार्टअप्समध्ये कोईरा, मेपलडॉटआय, क्युलान, स्किटी, ग्लोवाटीक्स यांचा समावेश आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत ३३० स्टार्टअप्सनी सहभाग घेतला होता. या स्टार्टअप्सची वृद्धी आणि बाजारपेठेतील प्रभाव यांची गती वाढवण्यासाठी ही स्पर्धा विशेष डिझाईन करण्यात आली आहे.
 
 
महाराष्ट्र हे नावीन्य व उद्यमशीलतेचे केंद्र कायमच राहिले आहे, इथल्या भरभराटीला आलेल्या स्टार्टअप इकोसिस्टिमने भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीमध्ये लक्षणीय योगदान दिले आहे. गेम्स २४ बाय ७ च्या टेकएक्सपेडाइटमुळे या इकोसिस्टिमला चालना मिळणार आहे. टेकएक्स्पेडाईटसारख्या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही स्टार्टअप्सना वृद्धी आणि यश साध्य करता यावे, आर्थिक वृद्धीला व तंत्रज्ञान प्रगतीला चालना देता यावे यासाठी प्रचंड मोठा मंच तयार केला आहे. असे मत महाराष्ट्र राज्याचे विकास आयुक्त ( उद्योग ) दीपेंद्र सिंग कुशवाह यांनी मांडले.
 
 
टेकएक्स्पेडाईटमध्ये सहभागी झालेले स्टार्टअप हे स्टार्टअप भारतातील स्टार्टअप इकोसिस्टिममधील अफाट प्रतिभा दर्शवतात. एआय सोल्युशन्स आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमध्ये हे स्टार्टअप महत्वाची भूमिका बजावतील. महाराष्ट्र सरकारसोबत आमची भागीदारी उद्यमशीलता प्रतिभेला, नावीन्याला चालना देण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ देईल व देशातील तंत्रज्ञान वातावरण अधिक प्रभावी बनवेल. असे मत गेम्स२४X७चे सह-संस्थापक आणि सह-सीईओ डॉ त्रिविक्रमन थंपी यांनी मांडले.
 
 
या अंतिम फेरीत पोचलेल्या स्टार्टअप्सना मेन्टॉरशिप प्रोग्राममध्ये सहभागी करुन घेतले जाईल. स्टार्टअपच्या यशासाठी आवश्यक असलेले विविध विषय यामध्ये समाविष्ट केले जातील, तंत्रज्ञान प्रगती, व्यवसायाच्या निरंतरतेसाठी धोरणे, आर्थिक चौकट, बाजारपेठेत प्रसारासाठी दृष्टिकोन आणि इतर अनेकांचा समावेश असणार आहे.