अथेन्स : लॉरिस येथे लिव्ह इन नातेसंबंधात राहणाऱ्या युवतीची हत्या करून पाकिस्तानी कट्टरपंथीने पळ काढला. आरोपी पाकिस्तानी पुरूषाला घडलेल्या घटनेच्या २ वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाची माहिती ग्रीसमधील स्थानिक वृत्तमाध्यमाने दिली आहे. आरोपीला नेरलँड्समध्ये ताब्यात घेण्यात आले असून नंतर त्याला ग्रीसमध्ये दाखल करण्यात आले आणि सध्या तो लॉरिसमधील तुरूंगात तुरूंगवासाची शिक्षा भोगत आहे.
सप्टेंबर २००२ मध्ये एका मुलाची आई असलेली ३४ वर्षीय ग्रीक महिला इओआनाचा तत्कालीन जोडीदार असलेल्या पाकिस्तानी पुरूषासोबत राहणाऱ्या संबंधित फ्लॅ'मध्येच निर्घृण हत्या करण्यात आली होती. इओआनाचे डोके ठेचण्यात आले.
तिचा मतदेह हा एका कापडामध्ये गुंडाळण्यात आला होता. इओआनाने यापूर्वी पाकिस्तानी पुरूषावर घरगुती वादातून तक्रार दाखल केली होती. परंतु स्थानिक अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी पुरूषावर कोणतीही कारवाई केली नाही. एका आठवड्यानंतर इओआनचा मृतदेह हा एका कुजलेल्या अवस्थेत सापडला होता.
दरम्यान, पाकिस्तानी आरोपीवर अंमली पदार्थासंबंधित अनेक गुन्हे दाखल होते, त्यामुळे आरोपीला नेहमीच पोलीस ठाण्यामध्ये हजर राहावे लागत होते.