खंडणी प्रकरणी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी मंजूर, SIT कडून हत्या प्रकरणी ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु

    10-Jan-2025
Total Views |

vishnu chate 
 
बीड : (Vishnu Chate) विष्णू चाटेची ४ दिवसांची वाढीव कोठडी संपली असून आता त्याला खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. खंडणी प्रकरणात संशयित आरोपी विष्णू चाटे याला केज न्यायालयात दाखल करण्यात आले होते. केज न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केलेली आहे.
 
माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी विष्णू चाटे संदर्भात ही दुसरी सुनावणी झाली आहे. वकीलांच्या युक्तीवादानंतर अखेर विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी मंजूर झालेली आहे. विष्णू चाटेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणी ताबा मिळवण्यासाठी एसआयटी अर्ज करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आजच ही प्रक्रिया पूर्ण करुन ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे.
 
खंडणी आणि हत्या अश्या दोन गुन्ह्यांच्या प्रकरणांचा तपास दोन वेगळ्या तपासयंत्रणा करत आहेत. सीआयडीकडून खंडणीप्रकरणाचा तर एसआयटीकडून हत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. विष्णू चाटेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र आता त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यामुळे ह्त्या प्रकरणामध्ये त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आजच पूर्ण करण्यात येणार आहे.